Friday, 26 February 2016

परिवर्तनाची लाट

         ~ copy paste whatsapp ~
👉🏼 कोकणात कुणबी समाजात परिवर्तनाची आली लाट....
👉🏼१४ गावातील गाव प्रमुख गावकर यांनी केला ठराव,  जुनाट रूढी- परंपरा काढल्या मोडीत..
🔶जिल्हा रत्नागिरी, फेपडे वाडी मानसकोंड मंडळ व श्रीराम ट्रस्ट ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी, येथे गुरुवार दि. 30 मार्च 2017 रोजी गावकर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य म्हणजे हे आयोजन कुणबी समाजातील  
 फेपडे वाडी तरूणांनी केले होते. या गावकर परिषेदला एकूण  १४ गावचे गावकर, कारभारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यात महीलांचा सहभाग मोठा होता.
परिषदेत रूढी परंमपरा यावर चर्चा करून  महत्वाचे ठराव करण्यात आले.
♦१) लग्नात अक्षता म्हणुन यापुढे  तांदुळ वापरू नयेत कारण आपण शेतकरी आहोत. धन्य पिकवतो  आणि तेच  धन्य पायदळी तुडवले जाते म्हणून  यापुढे  तांदुळ वापरू नयेत त्याबदली टाल्या वाजवाव्यात असे सर्वानमते ठरवण्यात आले.
♦२) जमल्यास किवा मनाला पटल्यास शिव विवाह व सत्यशोधक पध्दतीत लग्न करावीत.
♦३) मुलीचे घर बघणीस जाताना ट्रक भरून न जातात महत्वाचे जाणकार लोकानी जावे व नवरी मुलीला मुलाचे घर दाखवावे.
♦४) पत्रीका न बघता दोन्ही परिवारांनी मुलगा, मुलगीला कोणता आजार, रक्त गट, शिक्षण, त्याच्या आवडी निवडी व मुला,मुलीचे काही कोणा सोबत काही संबध किवा परिवारातुन जबरदस्ती की दबावाखाली लग्न केले जात नाहीना याची विचारणा / तपासणी करावी.
♦५) मृत व्यक्ती चे अत्यंविधी दरम्यान मृतास  पाणी पाजणे हि चेष्टा करतात ती फक्त त्या व्यक्तीच्या फक्त कुटुंबाने करावी अन्य गावातील पाहुणे मंडळीनी करू नये.
♦६) अत्यंत महत्वाचे स्त्रियांना पतीच्या निधनानंतर तीचे कुंकु, बांगड्या, मंगळसुत्र, काढुन तीला विद्रूप करू नये. असे ठरविण्यात आले.
♦७) एखादी महिला  मयत झाली तर तीला आंघोळ  बाहेर अंगणात घालु नये व तिचे कपडे बाहेर बदलु नये. तिचे फक्त पाय धुणे किंवा आंघोळ घालायची असेल तर  घरातील बाधरूम मध्येच घालुन तीला नंतरच बाहरे आणावे.
♦८) समाजातील व्यक्तीच्या निधना नंतर त्याचे पुढिल कार्य ५ / ७ दिवसाने फोटो पुजनाने करून सुतक काढुन टाकावे.
♦९) मुल जन्माला आले की सुवेर पाळला जातो तो न पाळावा.
✍🏼कुणबी समाजात हि एक मोठी क्रांती आहे.. जुनाट पीठिका-परंपरा आता गावोगावी बदलल्या जात आहेत. गरज आहे समाज संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्याची..

      या उपक्रमाला  बहुजन विकास आघाडीचे शिवश्री, तानाजी कुल्ये यांनी आपण स्वत: शिव विवाह पध्दतीने विवाह केला. माझ्या पत्नीला लाखो कीलो मिटर वर असणारा मंगळग्रह आहे.पण तो काही त्रास देत नाही, हे त्यानेच सांगितले. मला १पत्य झाले आहे. ५ वर्षात कोणतीच डचण आली नाही. व समाजाने कशा पध्दतीने ग्रामिण भागात काम केले पाहीजे. आपण आज सगळे परिवर्तन करण्यास जन्माला आहात योग्य निर्णय घ्या पुढील पिढी चांगली  घडेल. कुणबी युवा रत्नागिरी तालुकाध्यक्ष विकास वि. पेजे यांनी विचार मांडताना बळीराजा, शिव विवाह, पध्दत,व संताची शिकवण महापुरूषांचे विचार घेवुन समाजाने वाटचाल केली पाहीजे. आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देवुन त्यांना सरकारी नोक-यांमध्ये उच्चपदांनवर अधिकारी बनविण्यास प्रयत्न केले पाहीजेत. उपस्थित गावकरांनी आपल्या गावात सामाजिक बैठका घेवुन आजच्या परिषदेतील ठरावाचे वाचन करावे.. शिव विवाह, उत्तर कार्य,वर्ष श्रद्धा कसे करावे  याचे प्रत्यक्षीक व मार्गदर्शन मारुतीकाका  यांनी केले. पुढील काळात आपण स्वावलंबी बनायचे आहे.  समाजात आज परिवर्तनाची जास्त गरज आहे. यावेळी प्रमुख गावकर मंडळी, अण्णा घडशी, माजी मुख्याध्यापक घडशी गुरूजी, पेंटर, आंबा व्यापारी आग्रे शेठ, हरिषचंद्र गोरीवले, तरूण उद्योजक सिध्येश चिंदाण, अंधश्रध्दा निर्मुलनचे विनायक गावडे, तसेच गावातील मान्यवर महीला, पुरुष व युवा वर्ग  उपस्थित होते.